सामाजिक
डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने

सातारा: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवलखे, प्रदेश सरचिटणीस मनीषा रोटे, उज्वला रसाळ यांच्यासह सातारा जिल्हा कार्यकारणी उपस्थित होती.निदर्शनांमध्ये सातारा जिल्हा महिला अध्यक्ष सुषमा राजे घोरपडे, अनिता जाधव, हजरा शिखलगार, प्राची ताकतोडे, धनश्री मालुसरे, रजनी पवार, मालन परळकर, अनिता भोसले, मंजिरी पानसे, मेघा बेंद्रे, अरुणा नाझरे यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी तातडीने व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली.







