सामाजिक
आज रोजी अकलुज पोलीस ठाणे येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त, रन फॉर युनिटी एकता दौडचे आयोजन केले

सह. संपादक महेश पांडवे
सदरची एकता दौड ही अकलुज येथील श्री विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल ते महर्षि चौक- सदुभाउ चौक- प्रतापसिंह चौक- सुजयनगर अकलुज पोलीस स्टेशन अशी मिनी मॅरेथान घेण्यात आली असुन सकाळी 07.00ते 08.00 वाजता संपली आहे. सदर मॅरेथॉन करीता स्वत. संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज व पोलीस निरीक्षक नीरज उबाळे साहेबअकलुज पोलीस ठाण्याकडील 4 पोलीस अधिकारी व 23 पोलीस अंमलदार तसेच समरजित अकाडमी 60, पत्रकार, डॉक्टर, पोलीस पाटील असे एकूण 150 जण असे हजर होते.







