शंकर महाराज प्रकट दिन माळीनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा

मुख्य.संपादक महेश खडके
योगीराज श्री शंकर महाराज यांचा प्रकट दिन माळीनगर येथे मोठ्या भक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाराजांना मानणारा मोठा वर्ग केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर पसरलेला आहे, या सोहळ्यात भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंकर महाराजांच्या एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सिगारेटचा नैवेद्य दाखवला जातो अन्य देव-देवतांना सात्विक नैवेद्य दाखवण्याची परंपरा असताना, महाराजांना मात्र पेटवलेली सिगारेट अर्पण करण्याची पद्धत आहे.
आज प्रकट दिनानिमित्त माळीनगर येथील मंदिरात महाराजांच्या समाधीसमोर पारंपरिक पूजा आणि विधींसह हा आगळावेगळा नैवेद्यही भाविकांनी अर्पण केला.
महाराजांचे भक्त याला महाराजांची एक लोकविलक्षण लीला मानतात. महाराजांचे जीवन आणि कार्य नेहमीच रूढ समजुतींपेक्षा वेगळे राहिले आहे, आणि त्यांचा हा नैवेद्य त्याच अलौकिकतेचे प्रतीक आहे असे मानले जाते.
संपूर्ण दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
महाराजांच्या प्रतिमेचे आणि पादुकांचे महापूजन व अभिषेक करण्यात आले.
संपूर्ण दिवसभर भजन, कीर्तन, आणि महाराजांच्या जीवनचरित्राचे निरूपण सुरू होते.
यावेळी उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
व्यक्त करताना सांगितले की, महाराजांचा ‘मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।’ हा संदेश भक्तांना नेहमीच आठवण करून देतो की, त्यांच्या सद्गुरूंचे स्वरूप अलौकिक आणि अद्भुत आहे.
तिथीला असतो.







