अखिल भारतीय प्रजापती कुंभकार कुंभार संघ शाखेचा द्वितीय वर्धापन दिन साजरा
गुणवंत विद्यार्थी व समाजसेवकांचा गौरव

सातारा प्रतिनिधी :कैलास कुंभार
सातारा: अखिल भारतीय प्रजापती कुंभकार कुंभार संघ, शाखा सातारा यांचा द्वितीय वर्धापन दिन आणि जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या गुणगौरव सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक विजय राजे आणि प्राध्यापक डॉ. प्रशांत कुंभार यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.समाजरत्न’ पुरस्काराने सन्मान कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये आनंद कुंभार, राजेंद्र कुंभार, गोकुळ कुंभार, आणि नवरंग कुंभार यांचा समावेश होता. त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय प्रजापती कुंभकार कुंभार संघ, सातारा शाखेचे अध्यक्ष जयसिंग कुंभार, महासचिव बाळासाहेब राजे, कैलास कुंभार (सचिव), राजेंद्र राजे (सचिव), संपर्कप्रमुख मोहन कुंभार आणि कायदेशीर सल्लागार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे कार्य केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि उपस्थितांचे आभार कैलास कुंभार यांनी मानले. समाज आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेला हा गुणगौरव सोहळा उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला.

