सेवासदन प्रशाला अंकोली येथे क्रीडासप्ताहाचा उत्साहात शुभारंभ

अंकोली (प्रतिनिधी): दादासाहेब जगताप
अंकोली येथील सेवासदन प्रशाला येथे क्रीडासप्ताहाचा भव्य शुभारंभ प्रमुख पाहुणे विलास कुलकर्णी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उत्साहात पार पडला. आंतरराष्ट्रीय खेळाडू वृंदा बोद्धूल आणि राज्यस्तरीय खेळाडू ऋतुजा काळे यांच्या हस्ते क्रीडाज्योत संचलन सादर करण्यात आले,यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते क्रीडाप्रमुख ज्ञानेश्वर काळे यांनी सन २०२४–२५ चा क्रीडा अहवाल सादर केला.
कार्यक्रमात विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या कु. वृंदा बोद्धूल आणि राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या कु. ऋतुजा काळे यांचा गौरव करण्यात आला. गतका, ज्यूदो, कुस्ती, रोलबॉल, बुद्धिबळ, योगासन अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर संदेश दिला.या सप्ताहात धावणे, लंगडी, दोरीवरील उड्या, स्लो सायकल, डॉजबॉल अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यशस्वी आयोजनासाठी सेवासदन संस्थेचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी उपाध्ये यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार यांनी केले.