मारकडवाडी येथील युवक सुरज रणदिवे यांचे हृदयविकाराने निधन

सहसंपादक महेश पांडवे9511875416
माळशिरस: तालुक्यातील मारकडवाडी येथील एक उमदा आणि तरुण चेहरा सुरज हनुमंत रणदिवे (वय ३०) यांचे शुक्रवारी (९ जानेवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने मारकडवाडीसह संपूर्ण माळशिरस परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज यांना शुक्रवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सूरज रणदीव हे जनसत्ता न्यूज चे संपादक. सचिन रणदिवे यांचे लहान बंधू होते.अवघ्या ३० व्या वर्षी एका तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.आल
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि रणदिवे परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
ॐ शांती! 🙏







