इंदापूर.नगराध्यक्ष पदासाठी भरत शहा इच्छुक? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अजित दादा पवार गटात प्रवेशाची ही चर्चा चालू आहे

सहसंपादक महेश पांडवे.9511875416
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडाव
भरत शहा यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेमुळे शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे
भरत शहा हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.
भरत शहा हे इंदापूरमधील एक दिग्गज राजकीय घराणे म्हणून ओळखले जातात. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याची तयारी दर्शवल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या संभाव्य प्रवेशामुळे इंदापूरमधील स्थानिक राजकारणाचे समीकरण बदलू शकते.
मंत्री दत्तात्रय भरणे यांचे मौन
या विषयावर प्रतिक्रिया विचारली असता, राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. “भरत शहा यांच्या प्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय अजित पवार साहेब घेतील,” असे स्पष्ट करत त्यांनी सध्या मौन पाळले आहे.
नगराध्यक्ष पदाची दावेदारी?
भरत शहा हे यापूर्वी उपनगराध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला असल्याने त्यांचा शहरात चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या गटातील प्रवेश आणि नगराध्यक्ष पदासाठीची त्यांची इच्छा पाहता, अजित पवार गट इंदापूरमध्ये त्यांना मोठी संधी देतो की काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक निश्चितच रोमहर्षक होणार आहे.







