ऊस दर व थकीत बिलाबाबत जनहित शेतकरी संघटनेचे निवेदन
1 नोव्हेंबर भव्य रस्ता रोको आंदोलनाची घोषणा

पश्चिम महाराष्ट्र संपादक. दादासाहेब जगताप
सोलापूर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निश्चिती थकीत बिले तसेच साखर कारखान्याच्या अनियंत्रित आर्थिक व्यवहारा विरोधात तीव्र भूमिका सोलापूर जिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले यासोबत त्यांनी साखर सहसंचालक आणि साखर आयुक्त यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील कारखान्याच्या गंभीर तक्रारी मांडल्या चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ऊसाला 3500 दर जाहीर करावा पहिली उचल 3000 प्रति टन देण्यात यावे थकित तातडीने देऊन उशिरा भरल्यास 15% व्याजासह भरणा अनिवार्य करावा इतर प्रकारे होत असलेल्या वसुली ची पद्धत बंद कराव्यात जिल्ह्यामध्ये बरेच कारखान्याकडून शेतकऱ्याची बिले प्रलंबित आहेत कारखान्याने 15% व्याजदर लावून अन्यायकारक व्यवहार केला आहे असे त्यांनी सांगितले ह्या मागणी चे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साखर आयुक्त सहसंचालक आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना देण्यात आले
शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाला इशारा




