कृषीवार्ता

शेटफळ कालव्याच्या पाण्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान;

पिकांच्या नुकसानभरपाईची मागणी
इंदापूर तालुक्यातील सराटी येथील शेतकऱ्यांचे शेटफळ कालव्याच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले

Related Articles

सहसंपादक .महेश पांडवे
9511875416
असून, सुमारे ५० ते ६० एकर क्षेत्रातील मका, कांदा आणि ऊस यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी सलग चार दिवस शेतात शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतातील मातीही वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे
गेल्या चार ते पाच दिवसांपासून शेटफळ कालव्याचे पाणी भरून वाहत आहे. सराटी हद्दीतून गोंदीकडे जाणारा कालवा सध्या अस्तित्वात नसल्यामुळे अतिरिक्त पाणी बाहेर पडायला मार्गच राहिला नाही. परिणामी, हे पाणी थेट सराटी येथील सुमारे १२ ते १५ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये घुसले.
याबाबत माहिती देताना, नुकसानग्रस्त शेतकरी आणि सराटी गावचे उपसरपंच संतोष कोकाटे यांनी सांगितले की, यापूर्वी शेटफळ कालव्याचे अतिरिक्त पाणी संत तुकाराम महाराज पालखीच्या मार्गाजवळील चारीतून जीवननगर फाटा येथून भीमा नदीकडे जात असे. मात्र, पालखी मार्गामुळे आता ती चारी अस्तित्वात नाही. तसेच, शेजारी गटारीची कामे न झाल्यामुळे हे अतिरिक्त पाणी आता थेट शेतात घुसत आहे.
नुकसानभरपाईची मागणी आणि उपाययोजनेची विनंती
कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, आगामी काळात शेटफळ कालव्याचे अतिरिक्त पाणी व्यवस्थित मार्गांनी काढण्याची व्यवस्था जलसंपदा विभागाने करावी, अशी विनंती करण्यात आली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.