ताज्या घडामोडी

जय भवानीगड विकास प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय भव्य आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन; डॉ. चित्रलेखा ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

सहसंपादक .महेश पांडवे 9511875416

​लाखेवाडी / प्रतिनिधी:
जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा डॉ. चित्रलेखा श्रीमंत ढोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यस्तरीय भव्य आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, वक्तृत्व कौशल्य आणि सामाजिक जाणिवांना प्रोत्साहन देण्यासाठी या राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
​या वक्तृत्व स्पर्धेची रचना तीन वेगवेगळ्या वयोगट व गटांनुसार करण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे विषय निश्चित करण्यात आले आहेत:
​पहिली ते चौथी गट: विषय – ‘माझे देव माझे मायबाप’
​पाचवी ते सातवी गट: विषय – ‘मुलगी शिकली प्रगती झाली’
​आठवी ते बारावी गट: विषय – ‘पेपरफुटी: एक मानसिक विकृती’
​लहान वयापासूनच मुलांवर आई-वडिलांच्या संस्कारांची पाळेमुळे रुजणे, स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेल्या पेपरफुटीसारख्या गंभीर किडीवर विद्यार्थ्यांनी आपले परखड विचार मांडणे, या उद्देशाने या विषयांची निवड करण्यात आली आहे.
​स्पर्धेमध्ये राज्यभरातील नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके, ढाल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
​या उपक्रमामुळे डॉ. चित्रलेखा ढोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचा चांगला पायंडा पाडला जात असल्याचे मत नागरिक व पालकांमधून व्यक्त होत आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.