आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘पोलीस क्राईम नामा न्यूज नेटवर्क’तर्फे विनम्र अभिवादन!

पोलीस क्राईम नामा न्यूज नेटवर्क
विशेष वृत्त / प्रतिनिधी:
ब्रिटिश हुकूमशाहीविरुद्ध स्वातंत्र्याचा पहिला एल्गार पुकारणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३५ व्या जयंतीनिमित्त ‘पोलीस क्राईम नामा न्यूज नेटवर्क’ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन करण्यात आले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात राजे उमाजी नाईक यांचे योगदान ऐतिहासिक आणि अद्वितीय आहे. इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडणाऱ्या या महान योद्ध्याने आपल्या शौर्य, त्याग आणि रणनीतीच्या जोरावर ब्रिटिशांना हादरा दिला होता. त्यांचे हे क्रांतीकार्य आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
या पावन प्रसंगी बोलताना ‘पोलीस क्राईम नामा न्यूज नेटवर्क’च्या संपादकीय व व्यवस्थापकीय टीमने राजे उमाजी नाईक यांच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा दिला. समाजहित, न्याय आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्याची त्यांची शिकवण आजही वृत्तपत्र क्षेत्रासह प्रत्येक घटकाला मार्गदर्शक ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्रभरातून ‘पोलीस क्राईम नामा न्यूज नेटवर्क’च्या सर्व वाचक, प्रतिनिधी आणि नागरिकांच्या वतीने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!







