बावडा येथे नाभिक समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी विक्की राऊत उपाध्यक्ष गणेश भोसले यांची एकमताने बिनविरोध निवड!
नागोबा मूर्तीचा अभिषेक निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांच्या हस्ते संपन्न.

सहसंपादक. महेश पांडवे 9511875416
बावडा:
नागपंचमीच्या औचित्याने बावडा येथे आयोजित करण्यात आलेल्या नाभिक समाजाच्या विशेष बैठकीत समाजाच्या नूतन कार्यकारिणीची एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये बावडा नाभिक समाज अध्यक्षपदी विक्की राऊत यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकारी:
अध्यक्ष: विक्की राऊत
उपाध्यक्ष: गणेश भोसले
खजिनदार: विवेक शिंदे
सचिव: सागर गाडेकर
नागपंचमीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात श्री नागोबाच्या मूर्तीला अभिषेक घालून करण्यात आली. हा धार्मिक सोहळा निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. उदयसिंह (भैय्यासाहेब) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
मान्यवरांचा सत्कार व उपस्थिती:
या प्रसंगी बावडगावचे उपसरपंच श्री. रणजीत घोगरे, ज्येष्ठ नेते श्री. पंडित (आबा) पाटील यांच्यासह सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान नाभिक समाजाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला व बैठकीला बावडा परिसरातील नाभिक समाजाचे असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे समाजबांधवांकडून व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.







