इंदापूर तालुका भाजप ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीसपदी बावडा येथील भागवत जाधव यांची निवड

सहसंपादक. महेश पांडवे 9511875416
इंदापूर:
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा इंदापूर तालुक्याच्या सरचिटणीस पदी बावडा येथील सामाजिक कार्यकर्ते मा. भागवत विठ्ठल जाधव यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजपचे नेते प्रवीण भैया माने व प्रदीप दादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तालुकाध्यक्ष मा. सुनीलजी खाडे यांच्या शुभहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या नियुक्तीमुळे इंदापूर तालुका भाजप ओबीसी मोर्चाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून पक्ष संघटन वाढीसाठी भागवत जाधव यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती:

या नियुक्तीपत्र प्रसंगी पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीराम कुर्डे, पश्चिम महाराष्ट्र पंचायत राजचे उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील, तसेच पंचायत राजचे तालुकाध्यक्ष नवनाथ बाबरे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्ष संघटना बळकट करण्याचा संकल्प:
आपल्या निवडीनंतर बोलताना भागवत जाधव यांनी पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे मनस्वी आभार मानले. भारतीय जनता पार्टीचे धोरण आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील ओबीसी समाजापर्यंत पोहोचवून संघटना बळकट करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा निर्धार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
भागवत जाधव यांच्या निवडीबद्दल बावडा परिसरासह संपूर्ण इंदापूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







