मोहोळ मध्ये खळबळ प्रसिद्ध लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसाय पोलिसांनी केला पर्दाफाश.

महाराष्ट्र कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप
मोहोळ. तालुक्यातील कोळेगाव शिवारातील नक्षत्र लॉजमध्ये अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहोळ पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी लॉज चालक आण्णा किसन चवरे (वय ३६, रा. वडवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 143(2), 144(2) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 मधील कलम 3, 4, 5, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास कोळेगाव शिवारातील नक्षत्र लॉज येथे ही कारवाई करण्यात आली. लॉज चालकाने लॉजचा वापर अनैतिक मानवी व्यापारासाठी केल्याचा आरोप आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, एका 26 वर्षीय पीडित महिलेचे नाव गोपनीय ठेवण्यात आले असून, पोलिस नोंदीत अबक असे बदललेले नाव वापरण्यात आले आहे. संबंधित महिलेला लॉजवर काम देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेतले व पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तिच्या कमाईवर आरोपी स्वतःची उपजीविका करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अश्विनी सतीश घोलप (वय 29, नोकरी, रा. मोहोळ पोलीस ठाणे, ता. मोहोळ) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार दि. 31 जुलै 2026 रोजी रात्री 10.48 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर कलमांखाली गुन्हा
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 143(2), 144(2) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 मधील कलम 3, 4, 5 आणि 6 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.मोहोळ पोलिसांची पथकासह कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग मा. श्री. सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री. दासरी, पोलीस उपनिरीक्षक, पोहेकॉ/1608 गजानन माळी, पोहेकॉ रहीमन शेख, पोहेकॉ/1579 संदीप पाटील, पोकॉ/2148 संदीप सावंत, पोकॉ/1164 अमोल जगताप, पोकॉ अनिल वाघमारे व मोहोळ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.अनैतिक मानवी व्यापाराविरोधात पोलिसांची कडक भूमिका
या घटनेमुळे मोहोळ तालुक्यातील लॉज व हॉटेल व्यवसायामध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा असल्याचे दिसून येत आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या तसेच पैशांच्या आमिषाने महिलांचे शोषण करणाऱ्या प्रकारांवर पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
टीप : पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून तिचे नाव किंवा ओळख पटेल अशी माहिती जाहीर केलेली नाही. सदर प्रकरणातील आरोप हे पोलिसांनी नोंदवलेल्या फिर्यादीवर आधारित असून, न्यायालयीन निर्णय होईपर्यंत आरोपीला दोषी ठरवता येणार नाही.







