अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आनंतराव पवार विद्यालयात निर निमगाव येथे वृक्षारोपण.

संपादक. सुनील निकम.
इंदापूर.
स्थानिक अनंतराव पवार विद्यालय, निर निमगाव येथे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय घोगरे यांच्या शुभहस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर विद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
पर्यावरणाचा समतोल राखणे आणि हरित समृद्धीचा संदेश देणे हाच स्वर्गीय अजितदादांना खरा आदरांजलीचा मार्ग आहे, हे अधोरेखित करत उपस्थितांनी वृक्षारोपण केले.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे सदस्य, सभापती व उपसभापती यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आनंदराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब मोरे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. छगन, पिसे विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.







