प्रशासकीय

अकलूज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या ४ दिवसांत उघड; आरोपी गजाआड

सहसंपादक महेश पांडवे 9511875416

​अकलूज (प्रतिनिधी):
​दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास फिर्यादी हे हॉटेल ‘न्यू सुजित गार्डन’ येथून जेवण करून घरी जात होते. तांबोळी वसाहत रोडवर आरोपी आणि त्याच्या भाच्याने फिर्यादीला गाठले. त्यांना धक्काबुक्की करून गळ्यातील सोन्याची चैन, हातातील ब्रेसलेट आणि अंगठी असा एकूण ३ तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज (किंमत अंदाजे ३,२२,५०० रुपये) जबरदस्तीने हिसकावून घेतला. आरोपी आपली युनिकॉर्न मोटारसायकल घेऊन घटनास्थळावरून पसार झाले होते.
​पोलिसांचा तपास आणि कारवाई
​या घटनेनंतर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अकलूज पोलीस स्टेशनचे प्रभारी नीरज उबाळे साहेब यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
​तांत्रिक तपास: सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला.
​ अवघ्या चार दिवसांच्या आत तपास पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या आणि चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.
​​कमी वेळेत गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल प्रभारी अधिकारी नीरज उबाळे आणि त्यांच्या संपूर्ण तपास पथकाचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून, पोलीस प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
​”नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.” – अकलूज पोलीस प्रशासन कडून सांगण्यात आले

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.